गंगापुरच्या नगरसेविका वर्षा बोडखे यांचे जात प्रमाणपत्र अवैध

Foto
जात पडताळणी समितीचा निर्णय; कुणबी प्रमाणपत्र रद्द

गंगापूर, (प्रतिनिधी): नगर परिषदेच्या २०२५ सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा संजय बोडखे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. बोडखे यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर वर्षा बोडखे यांनी कुणबी जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता.
प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेल्या विविध कागदपत्रांची समितीने तपासणी केली. या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याने समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले.

आदेशात काय म्हटले ? समितीच्या आदेशानुसार, ज्योती दहीहंडे-शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेले कुणबी (इमाव) जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. संबंधित प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असून, मूळ जात प्रमाणपत्र समितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, निवडणुकीनंतर कुणबी जात संबंधितांनी प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.